विभागीय आयुक्तांनी घेतला नंदुरबार जिल्ह्याचा आढावा
नंदुरबार येथील जिल्हा परिषदेच्या याहामोगी सभागृहात नाशिक विभागाचे विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे यांच्या उपस्थितीत आढावा बैठक संपन्न झाली. यावेळी सांडपाणी व घनकचरा व्यवस्थापनाची कामे दिरंगाईने केल्यास कारवाई करण्यात येणार असल्याचे विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी सांगितले आहे, नंदुरबार जिल्ह्यात सांडपाणी व घनकचरा व्यवस्थापन, माझी वसुंधरा अभियान 4.0 ची कामे अभियान स्वरूपात राबवावीत, ही कामे मार्च अखेर पूर्ण करून गावे हागणदारी मुक्त अधिक करावीत, या कामात दिरंगाई व टाळाटाळ करणाऱ्या संबंधित कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्यात येईल असा इशारा विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी दिला, नंदुरबार येथील जिल्हा परिषदेच्या याहा मोगी सभागृहात विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी जिल्हा परिषद अंतर्गत राबविण्यात येत असलेल्या विविध योजनांचा आढावा घेतला, यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सावन कुमार, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी प्रमोदकुमार पवार, उपायुक्त डॉ.मनोजकुमार चौधरी, उपायुक्त डॉ.राणी चाटे, उपायुक्त सोनवणे, प्रकल्प संचालक आर.एन गावडे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (ग्रामपंचायत) जयवंत उगले, जनजीवन मिशनचे प्रकल्प संचालक एमडी धस आदी उपस्थित होते.
Advertisement
Trending News
Newsletter
Aliqu justo et labore at eirmod justo sea erat diam dolor diam vero kasd