Breaking News

अक्कलकुवा येथे संत काशिबा महाराज गुरव यांची जयंती साजरी

अक्कलकुवा येथे संत काशिबा महाराज गुरव यांची जयंती साजरी देव धर्म देश आणि माणुसकी जपणारा तसेच अनेक अश्या कलागुणांनी संपन्न असा असलेला गुरव समाज असुन ख-या अर्थाने संत काशिबा महाराज गुरव यांचा वारसा चालवणारा गुरव समाज आहे. असे प्रतिपादन ज्येष्ठ पत्रकार अनिल जावरे यांनी अक्कलकुवा येथे आयोजित संत काशिबा महाराज जयंती निमित्त आयोजित कार्यक्रमात केले सालाबादप्रमाणे मार्गशिर्ष शुक्ल दशमी ला गुरव समाजातील थोर संत काशिबा महाराज गुरव यांची जयंती अक्कलकुवा येथे आयोजित करण्यात आली होती. यावेळी मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन व प्रतिमा पुजन करण्यात आले. आपल्या प्रास्ताविकात प्रा, रविंद्र गुरव यांनी संत काशिबा महाराज गुरव यांच्या जिवनपटावर माहिती दिली यावेळी प्रा. डॉ जसपाल वळवी, प्रा.योगेश्वर बुवा, प्रभु तडवी,लोटन गुरव, आकाश गुरव, सुनील गुरव, प्रा. रविंद्र गुरव, अनिल जावरे, वेस्ता पाडवी, इमरान पठान, चंद्रकांत चव्हाण, अरुण मोरे, प्रभु तडवी, नितिन चौधरी, शुभम भंसाली, कमलेश शिंदे, प्रशांत मराठे, तुषार नाईक, गंगाराम वसावे, हेमंत परदेशी, आदि उपस्थित होते.कार्यक्रमाचे प्रास्ताविक रविंद्र गुरव व सुत्रसंचालन आकाश गुरव यांनी तर आभार प्रदर्शन लोटन गुरव यांनी केले

Ishwar Marathe
5023
Share with your Friends

Advertisement

Trending News

Newsletter

Aliqu justo et labore at eirmod justo sea erat diam dolor diam vero kasd

Lorem ipsum dolor sit amet elit
Get In Touch

Purnia, Bihar, India

info@publicview.in

Follow Us
Copyright © 2025 @ Public View. All rights reserved.
Made with skill by Myindex Inc.